पुण्यात कोरोना वाढतोय, सांडपाण्यात सापडले कोरोनाचे विषाणू

पुण्यात कोरोना वाढतोय, सांडपाण्यात सापडले कोरोनाचे विषाणू

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील सर्व 10 सांडपाणी प्रक्रिया केंद्रात कोरोना व्हायरस आढळले आहेत. CSIR- National Chemical Laboratory (NCL) ने याबाबत माहिती दिली आहे. NCL ने सांडपणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याची चाचणी केली आहे. त्यानुसार जेव्हा कोरोनाची लाट येत होती तशी परिस्थिती निर्माण होत आहे. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

NCL चे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश धरणे म्हणाले की आता हळू हळू कोरोना वाढत आहे. परंतु सांडपाण्यात जे कोरोनाचे नमुने आढळले आहेत, त्यांच्या पॉझिटीव्हिटीचा स्तर हा पहिल्या लाटेच्या वेळचा होता तसाच आहे असे डॉक्टरांनी सांगितला आहे.

डॉ. महेश म्हणाले की कोरोना पसरण्यापूर्वी लक्षात येतं. पहिला नमूना 22 एप्रिलला पॉझिटिव्ह मिळाला होता. 6 मेपासून या सांडपाण्याच्या प्रक्रिया प्रकल्पात मध्ये SARS-CoV-2 RT-PCR चाचणीतून कोरोनाचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोना वाढतोय आणि आपण काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;