फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन सर्वात भ्रष्ट, ठेकेदार अभिषेक कौल महाजनांचा दलाल; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणारे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा घणाघात करत महाजनांच्या भ्रष्टाचाराची आज पोलखोल केली. अभिषेक काwल नावाचा बिल्डर ठेकेदार गिरीश महाजनांचा दलाल आहे. तो महाजनांसाठी वसुली करतो आणि व्यवहार न झाल्याने महाजनांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात साडेतीनशे फायली मंजुरीविना पडून आहेत, अशी धक्कादायक माहितीही संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचे मंत्री मंत्रालयातील कामेच करत नाहीत, फक्त इतरांचे पक्ष फोडणे हा एकच अजेंडा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, गिरीश महाजन यांच्याकडे सर्वसामान्यांच्या आयुष्याशी आणि भवितव्याशी निगडित आपत्ती व्यवस्थापन खाते आहे. अभिषेक काwल हा महाजनांच्या कार्यालयात वसुलीसाठी बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकही फाईल मंजूर करत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. महाजन हे भ्रष्ट असल्यामुळेच भाजपच्या पेंद्रीय समितीचा त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध होता, असेही ते म्हणाले.

दलाल मंत्रालयाबाहेर फायली मंजुरी करतात

गिरीश महाजन यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यास तयार आहोत, ते कारवाई करणार नाहीत हे मला माहीत आहे, पण फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काय लायकीचे मंत्री आहेत हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. महाजनांचे दलाल मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फायली मंजुरी करतात.

देवेंद्र फडणवीसांनी महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल या ईडीपीडित साधुसंतांच्या पाया पडायला हवे. कारण त्यांच्यामुळेच फडणवीसांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. नाहीतर त्यांची तपस्या कधीच पूर्ण झाली नसती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;