एलिफंटा बेटावर उभारणार नवी जेट्टी; पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह, बैठकीची व्यवस्था

एलिफंटा बेटावर उभारणार नवी जेट्टी; पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह, बैठकीची व्यवस्था

जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावर जाण्यासाठी देश, विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालल्याने सध्या असलेल्या शेतबंदर जेट्टीवर कमालीचा ताण पडत आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी एलिफंटा बेटावर लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च होईल. सागरमाला योजनेतून उभारली जाणारी नवी जेट्टी सहा मीटर रुंदीची आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. नव्या जेट्टीवर पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह, बैठकीची व्यवस्था यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल असा विश्वास महाराष्ट्र मेरिटाइम बोडर्डाने व्यक्त केला आहे.

काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या लेण्यांमुळे एलिफंटाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये करण्यात आला आहे. शिवाची विविध रूपे साकारली असून लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून 20 लाखपिक्षा अधिक पर्यटक येत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने पर्यटक शेतबंदर जेट्टीपर्यंत येतात. सध्या ही जेट्टी फक्त चार मीटर रुंदीची असल्याने बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना अधिक त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरिटाइम बोडनि नवी जेट्टी बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • शेतबंदर जेट्टीपासून लेण्यांच्या पायऱ्यांपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते. नव्या प्रशस्त जेट्टीमुळे हा त्रास काहीसा कमी होईल, असे मेरिटाइम बोर्डाचे म्हणणे आहे.
  • पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी नवी जेट्टी बांधताना घेतली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या चार मीटर रुंदीच्या जेट्टीच्या मार्गावरूनच मिनी ट्रेन धावते. ही ट्रेन बच्चे कंपनीचे आकर्षण असून जेट्टी अरुंद असल्याने चालत जाणाऱ्या पर्यटकांना त्रास होतो. मात्र नव्या जेट्टीमुळे हा त्रास कमी होणार आहे.

जुन्या जेट्टीचे मजबुतीकरण
सहा मीटर रुंदीची नवी जेट्टी बांधत असतानाच चार मीटर रुंद असलेल्या जुन्या जेट्टीचेही मजबुतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना ये-जा करणे सोयीचे होणार असून पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊनच हे काम करण्यात येईल, असे आश्वासन मेरिटाइम बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;