धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही

धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईभर आंदोलन करू, उद्धव ठाकरे यांची रहिवाशांना ग्वाही

कुर्ला येथील मदर डेअरीची जागा उद्योगपती गौतम अदानी यांना देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याविरोधात धारावीकरांमध्ये नाराजी आणि संतापाबरोबरच अस्वस्थताही आहे. मात्र धारावीकरांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, धारावीकरांच्या हक्कासाठी शिवसेना मुंबईभर आंदोलन करेल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धारावीकरांना दिली.

धारावी बचाव आंदोलन कृती समिती आणि धारावीतील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महायुती सरकारकडून धारावीकरांवर अन्याय होत आहे. त्याविरोधात लढा उभारण्यासाठी शिवसेनेचे सहकार्य आणि पाठिंबा कायम राहावा, अशी विनंती यावेळी उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. शिवसेना धारावीकरांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी होती आणि पुढेही राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

शिवसेना धारावीकरांच्या पाठीशी नेहमीच पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे आणि या पुढेही तुमच्या सोबत राहील. – उद्धव ठाकरे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;