बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्याला परदेशात जाण्यास परवानगी, गुजरात हायकोर्टाचा निर्णय

बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्याला परदेशात जाण्यास परवानगी, गुजरात हायकोर्टाचा निर्णय

बँकांचे कोटय़वधी रुपये बुडवल्याचा आरोप असलेल्या गुजरातमधील उद्योजकाला परदेशात जाण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली. साई इन्पहसिस्टम लिमिटेडचा मालक सुनील कक्कड याने सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीमार्फत कक्कडची चौकशी सुरु आहे.

बँक अॅण्ड आयटी सपोर्ट आणि एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअरसाठी व्यापारांच्या संधी मिळवण्यासाठी कक्कडला दुबईत जाण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. कक्कडला 2014 मध्ये लायबेरियात अटक करण्यात आली होती. त्या गुह्याचा तपास सीबीआय करीत असून ईडीकडून मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बँक ऑफ बडोदाच्या विनंतीनंतर कक्कडविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कक्कडच्या परदेश यात्रेच्या याचिकेला बँक ऑफ बडोदाच्या वकिलांनी विरोध केला होता. कक्कड मालक असलेल्या साई इन्पहसिस्टम पंपनीला बँकांनी मोठय़ा प्रमाणात कर्ज दिले आहे. ती कोटय़वधी रुपयांची कर्जे बुडवल्याचा आरोप आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;