अरेरे.. शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला, निकृष्ट कामाचा पंचनामा

अरेरे.. शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला, निकृष्ट कामाचा पंचनामा

कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी आज ढासळली. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी वारंवार मागणी करूनही पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकामध्ये संताप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू आहे. संरक्षक भिंत आणि बुरुज डागडुजीचे काम निकृष्ट असल्याचा पंचनामाच भिंत कोसळल्याच्या निमित्ताने पुढे आल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला.

गेल्या चार वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत आणि बुरुज कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या किल्ल्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र या कामांदरम्यानच आज पहाटे किल्ल्याच्या तटबंदीचा मोठा भाग कोसळला. यामुळे प्रशासकीय हलगर्जीपणा समोर आला आहे.

घटनेनंतर शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय साळवी यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ते केवळ घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

किल्ल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवा!
दुर्गाडी किल्ला हा राज्य शासनाच्या मालकीचा असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपवण्यात आली आहे. न्यायालयानेही काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही कामांची गती अत्यंत संथ आहे. किल्ल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून किल्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी उपनेते विजय साळवी यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;