पक्षात कोणीही नाराज नाही, शिवसेना संपविण्याची भाषा सहन केली जाणार नाही! कोअर कमिटीचा इशारा

पक्षात कोणीही नाराज नाही, शिवसेना संपविण्याची भाषा सहन केली जाणार नाही! कोअर कमिटीचा इशारा

पक्षात कोणीही नाराज नाही. एकजुटीने काम सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संपविण्याची भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा आज शिवसेना कोअर कमिटीने भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांना दिला. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठीच पालकमंत्री नेमला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.

शिवसेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना नेस्तनाबूत होईल, असे वक्तव्य मंत्री गिरीष महाजन यांनी केले होते. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. कोअर कमिटी सदस्य खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, केशव पोरजे, भारती ताजनपुरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाने महाराष्ट्रात पाय रोवले, त्याच शिवसेनेला भाजपाने दगा दिला. आता या पक्षाला, मंत्र्यांना सत्तेची मस्ती आणि अहंकार आला आहे. शिवसेना संपविण्याची भाषा कदापिही सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. जिल्ह्याला पाच मंत्री असूनही सिंहस्थ कुंभमेळ्याची संधी साधून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यासाठीच पालकमंत्री नियुक्त केला जात नाही, असा आरोप करण्यात आला. शिवसेनेत कोणीही नाराज नाही, सर्व एकजुटीने, एकदिलाने काम करीत आहेत. या पक्षात आदेशाने काम चालते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच सर्व नियुक्त्या केल्या जातात, केल्या गेल्या आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी नियुक्त्यांचे स्वागत करून पक्षाचे काम सुरू ठेवले आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ही पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा फोन आला, असे दत्ता गायकवाड यांनी सांगितले. बडगुजर यांची पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष झाला.

या पत्रकार परिषदेस मामा राजवाडे, भैया मणियार, महेश बडवे, संतोष गायकवाड, बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, देवा जाधव, शैलेश सूर्यवंशी, गुलाब भोये, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, नीलेश साळुंखे, सुभाष गायधनी, मसूद जिलानी, योगेश गाडेकर, सचिन बांडे, सुनील गोडसे, दिलीप मोरे, राजेंद्र क्षीरसागर, ऋषी वर्मा, गोरख वाघ, संदेश फुले, सुनील निरगुडे, सुभाष शेजवळ, वीरेंद्र टिळे, कीर्ती निरगुडे आदी हजर होते.

सलीम कुत्तासोबतचे फोटो झळकावणाऱ्या नितेश राणेंची गोची

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबतचे बडगुजर यांचे फोटो मंत्री नितेश राणे यांनी समोर आणले होते व गंभीर आरोप केले होते. त्यामुळे बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातमीने राणे यांची गोची झाली. बडगुजर मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले, पण त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय झाला आहे का याची मला माहिती नाही. तसा निर्णय झाल्यानंतर मी बोलेन, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

…तर भाजपाची पीछेहाट होईल – सीमा हिरे

सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध दहशतवादी सलीम कुत्ताबरोबरच्या डान्स प्रकरणासह सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. पैशांसाठी त्यांच्याकडून महापालिकेतील ठेकेदारांची पिळवणूक केली जाते, असे आरोप नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांनी बुधवारी केले. प्रतिमा मलीन असलेल्या व्यक्तीला प्रवेश दिल्यास भाजपाची पिछेहाट होईल, पक्षाच्या विचारधारेविरोधात तो निर्णय राहील. गुह्यांतून सुटका होण्यासाठी बडगुजर भाजपात येण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, आमच्या पक्षात, कोअर कमिटीत व प्रदेश पातळीवर याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाचे सूज्ञ नेते त्यांना कुठल्याही परिस्थितीत प्रवेश देणार नाहीत, दहावेळा विचार करतील, असे सीमा हिरे यांच्यासह शहर भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहराध्यक्ष सुनील केदार, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, पैलास आहिरे, भाग्यश्री ढोमसे, माधुरी बोलकर, अॅड. प्रशांत जाधव, वैभव महाले, अंकुश वराडे, उखा चौधरी यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.

सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान