पुण्यात भाजप आमदारांमध्ये चंद्रकांत पाटीलच बाहुबली, कोथरूड मतदारसंघात मिसिंग लिंकची कामे सुसाट

पुण्यात भाजप आमदारांमध्ये चंद्रकांत पाटीलच बाहुबली, कोथरूड मतदारसंघात मिसिंग लिंकची कामे सुसाट

पुणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आठ मतदारसंघांपैकी कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंक आणि रस्त्यांची कामे सुसाट सुरू आहेत. आत्तापर्यंत कोथरूडमधील 4 मिसिंग लिंकची कामे पूर्ण झाली असून आणखी 4 मिसिंग लिंक जोडण्यासाठी 140 कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीने नुकतेच मंजूर केले आहेत. त्यामुळे शहरातील आठ मतदरासंघांत मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदरांमध्ये बाहुबली ठरले आहेत. वडगावशेरी मतदारसंघातील दोन मिसिंग लिंकची झालेली कामे वगळता भाजप आणि अजित पवार गटाचे आमदार निष्क्रिय ठरले आहेत.

शहराच्या विकास आराखड्यात रस्ते आखणी केली असून, काही रस्ते विकसित केले आहे. जागा ताब्यात न आल्याने या रस्त्यांची दुसऱ्या रस्त्यांशी जोडणी झाली नाही. अशा एकूण 30 मिसिंग लिंक प्राधान्याने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेणे आणि रस्ते बांधणीसाठी 850 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

या मिसिंग लिंक मार्गी

कोथरूड मतदारसंघातील 4 मिसिंग लिंक तातडीने पूर्ण करून घेण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली आहे. कात्रज ते देहू बायपास महामार्गाला जोडणाऱ्या महात्मा सोसायटीजवळील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले. बायपास मार्गाशेजारील सर्व्हिस लेनला जोडणाऱ्या मिसिंग लिंकसाठी दोन गुंठे जागा ताब्यात आली असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुतारवाडी बस डेपो ते महामार्ग मिसिंग लिंकचे काम सुरू होणार आहे. कर्व रस्ता ते पौड रस्ता यांना जोडणारी एक छोटी मिसिंग लिंक अशा 4 मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहेत. यासह कोथरूडमधील कर्वे पुतळा पेट्रोलपंप ते मिलन कॉलनी, राजाराम पूल ते जावळकर उद्यान आणि जावळकर उद्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील, कोथरूडमधील कृष्णाई कॉलनी आणि बालेवाडी गावठाण येथील लक्ष्मी माता मंदिर ते ज्युपिटर हॉस्पिटल चौक या चार मिसिंग लिंकसाठी 140 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

शहरात ज्या भागात मिसिंग लिंकची कामे झाली, तेथील वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली आहे. मिसिंग लिंकची कामे मार्गी लावण्यासाठी पथ विभाग प्रयत्न करीत आहे. अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका.

शहरातील इतर आमदार निष्क्रिय

शहरात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) एक आमदार आहे. सत्ताधारी पक्षाचे सात आमदार असूनही केवळ कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंकच्या कामाला प्राधान्य दिले गेले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व मिसिंग लिंकसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. निधीसाठी इतर आमदारांकडून मात्र मिसिंग लिंकच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने ते निष्क्रिय ठरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;