पालिकेतील भाजपची गुंडागर्दी थांबेना; भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा छळ, महिला आयोगाकडे तक्रार

पालिकेतील भाजपची गुंडागर्दी थांबेना; भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा छळ, महिला आयोगाकडे तक्रार

प्रशासकराजमध्ये पुणे महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱयांकडून गुंडागर्दी थांबायचे नाव घेत नाही. शहर भाजपच्या एका पदाधिकाऱयाकडून पालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱयाची छळवणूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्तांपासून महिला तक्रार समितीकडे तक्रार करूनही याची दखल न घेतल्याने शेवटी या महिला अधिकाऱयाने आता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करीत दाद मागितली आहे.

केवळ काwटुंबिकच नाही तर कामाच्या ठिकाणीही महिलांची छळवणूक होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला वैद्यकीय अधिकाऱयाने केलेल्या तक्रारीवरून उजेडात आले आहे. भाजपच्या कामगार आघाडीच्या अध्यक्षाकडून गेल्या पाच महिन्यांपासून या महिला अधिकाऱयाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित महिला अधिकाऱयाने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर झालेली आपबिती सांगून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, आयुक्तांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर संबंधित अधिकाऱयाने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर केवळ सुनावणी झाली, पुढे काय कारवाई झाली हे समितीकडून कळविण्यात आले नाही. दरम्यान, भाजपच्या संबंधित पदाधिकाऱयाकडून कार्यालयात येऊन त्रास देण्याचा प्रकार सुरूच असल्याने अखेर आता या महिला अधिकाऱयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाच्या अधिकाऱयांनी नुकतिच महापालिकेत येऊन अधिकाऱयाकडून माहिती घेतली असल्याचे या अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.

पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

भाजपच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱयाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता महापािलकेत आंदोलन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे पदाधिकारी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात कोणतीही पूर्व सूचना पोलीस स्टेशन अथवा सुरक्षा विभागाला न देता जमावाला सोबत घेऊन पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये येतात. त्यांच्या सोबत 30 ते 35 महिला व तरुण  सहभागी असतात. याबाबत महापालिकेच्या सुरक्षा विभागाने केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;