विमानतळावरून सोन्याची तस्करी करणारे अटकेत
परदेशी चलन आणि सोन्याची तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून तिघांना अटक केली. त्या तिघांकडून 22 लाखांचे सोने आणि चलन जप्त केले. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने आणि परदेशी चलनाच्या तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतली आहे. तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दोन प्रवासी विमानतळावर आले. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. त्यांच्या साहित्याची तपासणी केली. त्याने ट्रॉलीच्या जाहिरातीच्या स्टिकरखाली सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 22 लाख रुपये इतकी आहे.
त्यानंतर आणखी एक प्रवासी विमानतळावर आला. त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. तो मुंबईहून दुबईला जात होता. त्याच्या साहित्याची झडती घेतली. त्याच्याकडे 90 हजार डॉलर आढळून आले. जप्त केलेल्या डॉलरची किंमत सुमारे 76 लाख रुपये इतकी आहे. त्याला ते चलन कोणी दिले याचा तपास सीमा शुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List