Bangalore Stampede – काल तुमच्यासोबत आनंद साजरा केला आणि आज…; ऋषी सुनक यांच्याकडून शोक व्यक्त

Bangalore Stampede – काल तुमच्यासोबत आनंद साजरा केला आणि आज…; ऋषी सुनक यांच्याकडून शोक व्यक्त

रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघाने मंगळवारी तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यामुळे आरसीबीच्या चाहत्यांनी आनंद साजरा केला. पण हा आनंदांचे रुपांतर दुःखात झाले. चाहत्यांचा हा जल्लोष जिवावर बेतला असून बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक तरुण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर अनेक नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली. या अपघातानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ऋषी सुनक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या दुर्घनेवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. बंगळुरूमधील दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या आणि अक्षताच्या संवेदना आहेत. ‘आम्ही काल तुमच्यासोबत आनंद साजरा केला आणि आज आम्ही तुमच्यासोबत शोक करत आहोत’, असे म्हणाले.

गेली 18 वर्षे जेतेपदाचे स्वप्न उराशी घेऊन लढणाऱ्या बंगळुरूचे पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदाची विराट स्वप्नपूर्ती झाली. हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी लोखो क्रिकेटप्रेमींनी स्वप्न पाहिली होती. आणि हे स्वप्न अखेर सत्यात उतरले. हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनीही या सामन्याचा आनंद लुटला. यासंदर्भातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Bengaluru stampede – बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;