पाकिस्तानसाठी हेरगिरी; आणखी एक यूटय़ूबर अटकेत

पाकिस्तानसाठी हेरगिरी; आणखी एक यूटय़ूबर अटकेत

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाबमधून आणखी एका यूटय़ूबरला अटक केली आहे. जसबीर सिंग असे त्याचे नाव आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हाती घेतलेल्या कारवाईच्या मोहिमेत ज्योती मल्होत्रापाठोपाठ जसबीरला पंजाब पोलिसांनी अटक केली. त्याच्या इन्स्टाग्राम व यूटय़ूब चॅनेलवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडीओ आढळले आहेत.

जसबीरने एप्रिल 2024 मध्ये इन्स्टाग्राम हॅण्डलवर ‘जानमहल’ नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यात ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या दुकानात सूट खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. ज्योतीला यापूर्वीच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. जसबीर आणि ज्योती मल्होत्रा हिंदुस्थानी यंत्रणांशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवायचे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;