‘पॉवर’फूल लवंग तेल! लैंगिक समस्येसह ‘या’ आजारांवरही आहे वरदान!!
लवंगाचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. म्हणूनच लवंग केवळ आपण पदार्थ करण्यासाठी नाही तर, औषधासाठीही उपयोग करु शकतो. लवंग ही पुरुषांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. लवंग शरीराला उबदारपणा तर देतेच, परंतु पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर करण्यासही मदत करते. लवंगाचे तेल पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. पुरुषांमध्ये मधुमेहापासून ते शुक्राणूंशी संबंधित समस्यांपर्यंत समस्यांवर उपचार करण्यासाठी लवंग तेल हे प्रभावी मानले गेले आहे.
पुरुषांसाठी लवंग तेलाचे फायदे
वंध्यत्वाची समस्या
लवंग तेल कामोत्तेजकता वाढवते. हे पुरुष आणि महिला दोघांचेही लैंगिक जीवन सुधारण्यासाठी प्रभावी आहे. लवंगाच्या तेलाचा वापर करून वंध्यत्वाच्या समस्यांपासून बऱ्याच प्रमाणात सुटका मिळू शकते.
कर्करोग रोखणे
कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्यासाठी लवंग तेल प्रभावी ठरू शकते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करू शकते. या तेलात असलेले सुगंधी घटक युजेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स कर्करोग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यात मदत
पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी लवंग तेल उपयुक्त ठरू शकते. लवंग तेल पुरुषांमध्ये कामवासना वाढवते. त्याच वेळी, शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरते.
शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारते
लवंगामध्ये असलेली जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढवू शकतात. हे शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यास देखील मदत करू शकते. अशा परिस्थितीत, लवंगाच्या आवश्यक तेलाची अरोमाथेरपी घेतल्याने बरेच फायदे मिळतात.
व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी
लवंग तेल पुरुषांसाठी खूप प्रभावी ठरू शकते. व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. सिगारेट किंवा दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल, तर नियमितपणे लवंगाच्या तेलाने गरम पाण्याने स्नान करा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि पुन्हा सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होईल.
जलद वीर्यपतन रोखण्यासाठी
लवंग तेलाचा गुणधर्म हा उष्ण असल्याने, शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. लवंग तेल शीघ्रपतनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या पुरुषांसाठी खूप प्रभावी ठरू शकते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List