एलॉन मस्क कुर्ल्यातील गोदामासाठी मोजणार 24 कोटी

एलॉन मस्क कुर्ल्यातील गोदामासाठी मोजणार 24 कोटी

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारची चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जोरात सुरू आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये एक शोरूम उघडण्यात येणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर आता कुर्ल्यात एक गोदाम घेतले जाणार आहे. हे गोदाम 24 हजार 565 चौरस फूट जागेवर असून यासाठी मासिक भाडे 37.53 लाख रुपये ठरवण्यात आले आहे. हे गोदाम पाच वर्षांसाठी भाडय़ाने घेण्यात आले असून पाच वर्षांसाठी मस्क यांची कंपनी एकूण 24.38 कोटी रुपये भाडे मोजणार आहे. भाडय़ाव्यतिरिक्त, टेस्ला कंपनी संपूर्ण भाडेपट्टी कालावधीत कॉमन एरिया देखभाल शुल्कासाठी 1.62 कोटी रुपये देण्यास जबाबदार आहे. तसेच 2.25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव भरली आहे. भाडेपट्टी कराराची औपचारिक नोंदणी 16 मे 2025 रोजी झाली. 1 जून 2025 पासून भाडय़ाला सुरुवात झाली असून 19 एप्रिल 2023 पर्यंत लॉक इन क्लॉज पाच वर्षांचा आहे. या करारात 20 पार्ंकग स्पॉट्सची सुविधासुद्धा देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;