सर्वाधिक साक्षर राज्यांत मिझोरामने मारली बाजी, आंध्र प्रदेश, बिहारमध्ये सर्वात कमी साक्षरता दर
देशातील संपूर्ण साक्षर झालेल्या राज्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मिझोराम राज्याने 98.2 टक्के साक्षरता गाठत बाजी मारली आहे. दुसऱया स्थानावर लक्षद्वीप, तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे नागालँड व केरळ राज्य आहे. पीएलएफएस 2023-24 च्या सर्वेक्षणानुसार आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये देशातील सर्वात कमी साक्षरता दर नोंदवला गेला आहे. जो शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येसाठी अनुक्रमे 72.6 टक्के व 74.3 टक्के होता. बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी साक्षरता दर हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशक आहे. भारताच्या ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या मते, 7 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत वाचू, लिहू शकते किंवा समजू शकते ती साक्षर मानली जाते.
टॉपची 10 राज्य
मिझोराम 98.2 टक्के
लक्षद्वीप 97.3 टक्के
नागालँड 95.7 टक्के
केरळ 95.3 टक्के
मेघालय 94.2 टक्के
चंदिगड 93.7 टक्के
गोवा 93.6 टक्के
पुद्दुचेरी 92.7 टक्के
मणिपूर 92 टक्के
कमी साक्षरतेची राज्य
आंध्र प्रदेश 72.6 टक्के
बिहार 74.3 टक्के
मध्य प्रदेश 75.2 टक्के
राजस्थान 75.8 टक्के
झारखंड 76.7 टक्के
तेलंगणा 76.9 टक्के
उत्तर प्रदेश 78.2 टक्के
छत्तीसगड 78.5 टक्के
लडाख 81 टक्के
जम्मू-कश्मीर 82 टक्के
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List