सायबर घोटाळे रोखणार! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी E-Aadhaar वेरिफिकेशन आवश्यक

सायबर घोटाळे रोखणार! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी E-Aadhaar वेरिफिकेशन आवश्यक

फेक युजर आयडीचा वापर करून रेल्वेच्या तिकिटाची बुकिंग करण्याच्या सायबर घोटाळ्याच्या आयआरसीटीसीने पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात 2.5 कोटी फेक आयडीला ब्लॉक करण्यात आले आहे. सतत होणाऱ्या सायबर घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. भारतीय रेल्वे एक नवीन प्रणाली लागू करणार आहे. ज्यामुळे तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या वापरकर्त्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती शेअर केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी E-Aadhaar Authentication वापर सुरू करेल. यामुळे ग्राहकांना त्यांचे अनेक फायदे होणार आहेत. ही प्रणाली रेल्वेच्या वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यास मदत करेल. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या आयआरसीटीसी वेबसाइट वापरणारे 13 कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. यापैकी फक्त 10 टक्के वापरकर्त्यांचीच आधार पडताळणी झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठीच आता भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत आहे. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी धारकांनाच ऑनलाईन तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी मिळेल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी ऑथेंटिकेशन आवश्यक असेल.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश, आयआरसीटीसीकडून 2.5 कोटी फेक आयडी ब्लॉक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;