बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार

बोगस कॉलेजसह खासगी क्लासेसकडून पालकांची लुटमार

शहरात खासगी क्लासेसच्या मालकांकडून शिक्षणाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे. लाखो रुपये फी विद्यार्थी व पालकांकडून उकळली जाते. ही लुटमार करण्यामागे शहरातील तसेच तालुक्यातील काही डमी बोगस कॉलेजचा सहभाग आहे. याकडे शिक्षणाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत असून, याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना मेल करून त्यांचे लक्ष वेधले आहे.

अनेक वर्षांपासून खासगी क्लासेस व ज्युनिअर कॉलेज यांच्या संगनमताने विद्यार्थी व पालकांना लुटण्याच्या हा व्यवसाय सुरू आहे. यातून अशा काही कॉलेजमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात, त्यांची हजेरी ही ठरलेल्या वेळापत्रक वेळेनुसार कॉलेजला न राहता ती त्या खासगी क्लासला असते व संपूर्ण शिक्षण हे क्लासेसमध्ये चालते. संगनमताने सुरू झालेला हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहरात व तालुक्यात सुरू आहे. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

शासनाच्या आदेशानुसार अकरावी व बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये संपूर्ण हजेरी ही कॉलेजच्या वेळेनुसार असणे बंधनकारक असतानादेखील अनेक कॉलेजमध्ये शासननिर्णयानुसार बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जात नाही. सीसीटीव्ही प्रत्येक वर्गात आहेत का नाही, हे पहिले जात नाही. त्यामुळे अनेक कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी ही कॉलेजच्या वर्गात नसून, खासगी क्लासेसमध्ये असते. अशाप्रकारे अहिल्यानगर शहरात काही कॉलेजेस बोगस पद्धतीने कामकाज करत आहेत. त्यासाठी पालकांकडून कॉलेज आणि खासगी क्लासेस बक्कळ पैसा उकळत आहेत, असा आरोप नितीन भुतारे यांनी पाठवलेल्या मेलमध्ये केला आहे.

बोगस कॉलेजेस आणि खासगी क्लासेसच्या अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा नवीन शैक्षणिक वर्षात अकरावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांची हजेरी ही कॉलेजच्या वर्गात शैक्षणिक वेळेनुसार बंधनकारक करा. शासननिर्णयानुसार बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावली जात नसेल आणि विद्याथ्यर्थ्यांची हजेरी शिक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाणार नसेल तर शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नितीन भुतारे यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;