Pune news – हॉटेल, पबचालकांना इशारा; रात्री दीडच्या ठोक्यावर शटर डाऊनच हवे! वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार

Pune news – हॉटेल, पबचालकांना इशारा; रात्री दीडच्या ठोक्यावर शटर डाऊनच हवे! वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार

पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवणे, आमच्यासाठी महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने वेळोवेळी प्राधान्य दिले जात आहे. मात्र, काही दिवसांपासून हॉटेल व्यावसायिक, पबचालकांसह इतर आस्थापना वेळेच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार संबंधित आस्थापना व्यावसायिकांनी रात्री दीड वाजेपर्यंत बंधन पाळणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतरही व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिल्याप्रकरणी आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच जबाबदार धरले जाणार आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पबसह हॉटेल व्यावसायिकांची मुजोरी वाढल्यामुळे टवाळखोरांचेही फावले असल्याचे दिसून आले आहे. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत आस्थापना उघड्या ठेवून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र, तरीही संबंधित हद्दीतील ठाणेप्रमुखांकडून संबंधितांना व्यवसायासाठी मूकसंमतीची मुभाच दिली जात आहे. त्यामुळे हे जर थांबले नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याप्रकरणी जबाबदार धरले जाणार असल्याचा आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

नवीन वसुली बहाद्दर रडारवर

पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसुली करणाऱ्या स्पेशल 65 वसुली बहाद्दरांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा दणका दिला होता. मात्र, आता बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नवीन वसुली बहाद्दर तयार झाले आहेत. त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने अवैध धंदेवाईकांना पाठबळ देऊन वसुली केली जात आहे. त्यासोबतच स्पा, मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेटही चालविण्यात येत आहे. त्यापाश्र्वभूमीवर आता नव्याने तयार झालेल्या वसुली बहाद्दरांनाही दणका दिला जाणार आहे.

“न्यायालयासह शासनाच्या नियमाप्रमाणे हॉटेल, पबसह इतर आस्थापना व्यवसाय वेळेत बंद होणे अपेक्षित आहे. मात्र, काही जणांकडून गैरफायदा घेत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक ठाणेप्रमुखांनी अशाप्रकारे आस्थापना चालकांकडून कृत्य आपल्या हद्दीत होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधिताला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.”

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;