दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची धुरा! तालिबान प्रतिबंध समितीत अध्यक्षपदावर नियुक्ती

दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची धुरा! तालिबान प्रतिबंध समितीत अध्यक्षपदावर नियुक्ती

दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. परिषदेतील तालिबान प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदावर पाकिस्तानची नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानचा मित्र चीन तालिबानशासित काबूल आणि इस्लामाबादमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. याचदरम्यान पाकिस्तानच्या हाती समितीची धुरा आली आहे.

गेल्या महिन्यातच चीनने तालिबान आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. तालिबान प्रतिबंध समिती ही अफगाणिस्तानच्या शांती, स्थिरता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या व्यक्ती, गट व संस्थांची आर्थिक संपत्ती जप्त करण्याचा तसेच प्रवास आणि शस्त्रांवर बंदी घेणे यांसारखे निर्णय घेऊ शकणार आहे. सुरक्षा परिषदेच्या सहाय्यक समितींच्या 2025 च्या यादीनुसार, पाकिस्तान केवळ तालिबान प्रतिबंध समितीचे नेतृत्व करणार नाही तर संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सांभाळणार आहे. या समितीचे अध्यक्षपद अल्जीरिया करणार आहे आणि फ्रान्स, रशिया व पाकिस्तानकडे उपाध्यक्षपद असणार आहे. डेन्मार्क संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 आयएसआयएल आणि अल-कायदा प्रतिबंध समितीचे नेतृत्व करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;