ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी; आरटीआयमधून माहिती उघडकीस

ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी; आरटीआयमधून माहिती उघडकीस

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीस संबंधित वाहनधारकाविरोधात ई-चलान जारी करतात. पण ई-चलान जारी करण्याच्या प्रक्रियेविरोधात वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत ई-चलानविरोधात 1 लाख 81 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळण्यात आल्याचे माहिती अधिकारातून (आरटीआय) उघडकीस आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ई-चलानविरोधातील वाहनधारकांच्या ऑनलाइन तक्रारींचा तपशील मागवला होता. त्यांच्या अर्जाला उत्तर म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ई-चलानविरोधात एपूण 1 लाख 81 हजार 613 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 लाख 7 हजार 850 तक्रारी म्हणजेच जवळपास 59 टक्के तक्रारी फेटाळण्यात आल्या. सद्यस्थितीत दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहन, मालवाहू अशारीतीने वाहन प्रकारानुसार तक्रारींचे वर्गीकरण पोर्टलवर उपलब्ध नाही. त्यामुळे विशिष्ट वाहन गटांवरील कारवाईचे विश्लेषण करणे शक्य नाही, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. दरम्यान, ई-चलान प्रणाली पारदर्शक असावी, नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची सखोल तपासणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

तक्रार पडताळणी

‘वन स्टेट वन चलन’ पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारी वरळीतील मल्टिमीडिया सेलमार्फत तपासल्या जातात. यामध्ये वाहनांच्या प्रतिमा व इतर दृश्यांतील पुराव्यांचे मूल्यांकन करण्यात येते. पुरावे अस्पष्ट असतील तर त्या तक्रारी संबंधित वाहतूक विभागाकडे पुढील पडताळणीसाठी पाठवल्या जातात.

 556 कोटी रुपये दंडाची वसुली

‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तब्बल 556 कोटी 64 लाख 21 हजार 950 रुपये इतका दंड वसूल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्… पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्…
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अचानक प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नजर चुकवत कारच्या...
अंकिता लोखंडे प्रेग्नेंट आहे? पती विकीसोबत मालदीव व्हॅकेशनमधील अंकिताचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा
कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याने सर्वांच लक्ष वेधून घेणारी डॉक्टर कोण? जी अभिनेत्रींनाही देते टक्कर
90s च्या जमान्यात जायचंय? तर हे Whatsapp चं नवं Walkie Talkie फिचर वापरा!
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप
सर्व मर्यादा ओलांडल्या! तामिळनाडूतील छापेमारीवर सर्वोच्च न्यायालयाचे ईडीवर कडक शब्दात ताशेरे
Arjun Khotkar : शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत काय कांड?; त्या आरोपांवर मंत्री अर्जुनराव खोतकर यांची पहिली प्रतिक्रिया