शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका, सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका, सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

1967 पासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले कडवट शिवसैनिक व पनवेल महानगरपालिका क्षेत्र सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. राजकारणाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय भाग घेणाऱ्या मुंबईकर यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

बाळाराम मुंबईकर हे तळोजा येथील भोईर पाडा येथे राहत होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुख पदाचीही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या निधनामुळे निष्ठावान शिवसैनिक हरपल्याची भावना शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंबाबतची खंत काय? संजय राऊत यांनी बोलून दाखवली मनातली सल राज ठाकरेंबाबतची खंत काय? संजय राऊत यांनी बोलून दाखवली मनातली सल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलं आह. याच पुस्तकात...
Sanjay Raut : मविआ सरकार पाडायचं दिल्लीतच ठरलं होतं, भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा राऊतांकडून गौप्यस्फोट काय?
अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता… संजय राऊत यांचा सूचक इशारा
Rain Alert : आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, आज आणि उद्या वादळी पाऊस, हवामान खात्याचा काय इशारा
दीपिकाला गंभीर आजाराने परत घेरलं, नवऱ्याने दिली हेल्थ अपडेट, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
सैफ अली खानच्या संपत्तीचं पाकिस्तानशी खास कनेक्शन, झाली मोठी कारवाई
लैंगिक छळ प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला तब्बल 5 वर्षांनंतर दिलासा, पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता