कोहलीचा आणखी एक विराट विक्रम

कोहलीचा आणखी एक विराट विक्रम

आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहली विक्रमांचे इमले रचत आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत त्याने 909 गुणांपर्यंत झेप घेतलीय. याचबरोबर आयसीसी पुरुष क्रमवारीत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 900 गुणांचा टप्पा पार करणारा तो क्रिकेटविश्वातील एकमेव फलंदाज ठरला आहे, हे विशेष. गेल्या वर्षी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत 76 धावांची खेळी करणाऱया कोहलीने आपल्या टी-20 क्रमवारीत मोठी सुधारणा केली. विक्रमानुसार आयसीसीने त्याच्या मानांकनाला 897 वरून थेट 909 पर्यंत नेले आहे. ही टी-20 क्रमवारीत फलंदाजाने मिळवलेले तिसरे सर्वाधिक गुण आहेत. हिंदुस्थानचा सूर्यकुमार यादव (912) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) यांच्यानंतर विराट तिसऱया क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटचे सर्वोच्च 937 गुण मिळवले आहेत. हे हिंदुस्थानी खेळाडूने मिळवलेले आजवरचे सर्वाधिक गुण आहेत. 2018 मध्ये इंग्लंड दौऱयावर त्याने 10 डावांत दोन शतके व तीन अर्धशतकांसह 593 धावा फटकविल्या होत्या. तसेच त्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱयावरच वन डे रेटिंगमध्येही 909 गुण गाठले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘पंचायत’ फेम अभिनेत्याला 34 व्या वर्षी हार्ट अटॅक, तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढलंय? ‘पंचायत’ फेम अभिनेत्याला 34 व्या वर्षी हार्ट अटॅक, तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढलंय?
‘पंचायत’, ‘पाताल लोक’ आणि ‘मिर्झापूर’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेता आसिफ खानला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या अवघ्या...
पंढरपुरात माय-लेकराचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना
बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत! निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी रणनीती
‘तेजस एमके-1 ए’ निर्मितीला वेग; डिसेंबरपर्यंत तयार होणार 12 स्वदेशी फायटर
नोकरीचे कॉल लेटर उशिरा मिळाले तर…
Andre Russell Announces Retirement – विंडीजच्या ‘मसल पॉवर’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम; कधी खेळणार शेवटचा सामना?
ट्रेंड – डिव्होर्स कॅम्प… नवी सुरुवात