डेडलाइन पुन्हा हुकली, सरकारने नवी पुडी सोडली; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता 2026 चा नवा वायदा

डेडलाइन पुन्हा हुकली, सरकारने नवी पुडी सोडली; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आता 2026 चा नवा वायदा

मागील चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पुन्हा नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र अजूनही बायपास, उड्डाणपूल, मोऱ्यांची कामे रखडली असल्याने आता डिसेंबर 2025 ऐवजी मार्च 2026 चा नवीन वायदा देण्यात आला आहे. मात्र रखडलेल्या कामांची जंत्री मोठी असल्याने पुढच्या वर्षीही चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांची थट्टा थांबणार कधी, असा सवाल सरकारला केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले होते. औद्योगिक वसाहती, व्यापारी बंदरे आणि पर्यटन स्थळांना जोडणारा हा मार्ग असल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 2011 साली पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या कामाची सुरुवात झाली होती, तर इंदापूर ते झाराप हे काम 2014 नंतर मंजूर करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात चौपदरीकरण आणि डांबरीकरण तर दुसऱ्या टप्प्यात काँक्रीटीकरणाचा समावेश होता. आता रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यातील महामार्गाचेही काँक्रीटीकरण करण्यात येत आहे, तर संपूर्ण काम रखडल्याने कामाचे लहान-लहान 12 तुकडे करून कंत्राटदारांना काम विभागण्यात आले आहे. मात्र यानंतरही महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

महामार्गाच्या कामाचे 12 टप्पे

महामार्गाचे काम रखडल्याने लहान-लहान टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात पळस्पे ते कासू, कासू ते इंदापूर, इंदापूर ते वडपाले, वडपाले ते भोगाव, भोगाव ते कशेडी, कशेडी ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड, वाकेड ते तलगाव, तल गाव ते कालगट आणि कालगट ते झाराप असे एकूण बारा टप्पे करण्यात आले आहेत.

महामार्गाची सध्याची स्थिती

महामार्गावर सद्यस्थितीत ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तसेच 25 ते 30 किलोमीटर वेगाने वाहन चालवावे लागत असल्याने महामार्गावर नियमित वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

पाच वर्षांपासून तारीख पे तारीख

मागील पाच वर्षांपासून दरवर्षी 31 डिसेंबरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा सरकार न चुकता करतात. हा सिलसिला 2025 मध्येही सुरू राहिला असून डिसेंबर 2025 ही काम करण्याची दिलेली डेडलाइन चुकणार असून मार्च २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ही माहिती दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली
पावसाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेत असल्याने विरोधकांनी तीव्र शब्दात...
लग्नानंतर माझ्याकडे काम नव्हते, त्यावेळी मी गौतमीच्या कमाईवर जगत होतो! राम कपूर
पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे, शरीरासाठी ते किती फायदेशीर? घ्या जाणून
अहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत मोठा खुलासा; कॅप्टननेच विमानाच्या इंजिनचे इंधन केले बंद
Nashik Accident – मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; लहान बाळासह 7 जणांचा मृत्यू
इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, 50 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
Bengaluru Stampede – चेंगराचेंगरीला RCB जबाबदार; कर्नाटक सरकारने हायकोर्टात सादर केला अहवाल, कोहलीचाही उल्लेख