श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न, 24 तास दर्शन व्यवस्था आजपासून बंद

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न, 24 तास दर्शन व्यवस्था आजपासून बंद

आषाढी एकादशी रविवार, दिनांक 6 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि. 27 जून रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.

आज बुधवार, दि. 16 जुलै रोजी मुहूर्तानुसार श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य श्री भास्करगिरी बाबा व ह.भ.प. प्रकाश जवंजाळ यांच्या हस्ते संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला व्यवस्थापक मनोज श्रोत्री व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले.

तसेच श्रीस अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. आजपासून श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;