माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा आरोप

माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा आरोप

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे. मात्र या हल्ल्याचे मास्टरमाईंड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. आज एका आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटे यांचे गॉडफादर आहे. यावेळी त्यांनी काही व्हिडीओही समोर आणले. या व्हिडीओत चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटे याला उद्देशून म्हणताना दिसत आहे की, “देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः तुझ्या पतीशी आहोत.”

प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत की, “माझी आज अशी मागणी आहे की, सरकारला जर नैतिकता साबूत असेल तर या घटनेचा मास्टरमाइंड हे बावनकुळे आहेत. बावनकुळे हे आता महसूल मंत्री असून, ते दोन नंबरचे मंत्री आहेत. ते सभागृहात आणि प्रसारमाध्यमांपुढे खोटे बोलत आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;