‘तेजस एमके-1 ए’ निर्मितीला वेग; डिसेंबरपर्यंत तयार होणार 12 स्वदेशी फायटर
हिंदुस्थानी वायुदलाला ‘तेजस एमके – 1 ए’ची प्रतीक्षा आहे. हे संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ते विकसित करत आहे. त्याची डिलिव्हरी आता वेग पकडत आहे. अमेरिकन कंपनीने जेट इंजिनाचा पुरवठा सुरू केला आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत 12 तेजस विमाने तयार होतील.
आतापर्यंत 83 लढाऊ विमानांची ऑर्डर
वायुदलाने आतापर्यंत 83 ‘एमके- 1ए’ फायटर जेट्सची ऑर्डर दिली आहे. याव्यतिरिक्त संरक्षण मंत्रालय सुमारे 67 हजार करोड रुपये खर्चून 97 आणखी ‘एमके- 1 ए’ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. ‘जीई एअरोस्पेस’ने या वर्षाअखेरपर्यंत 10 इंजिन सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली आहे.
एक इंजिन विमानाला लावायला आणि त्याची टेस्टिंग करायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.
‘तेजस एमके – 1’ची डिलिव्हरी मार्च 2024 पासून सुरू होणार होती. मात्र अमेरिकेच्या ‘जीई एअरोस्पेस’ने विलंब केल्यामुळे ‘तेजस एमके – 1 ए’ची डिलिव्हरी वर्षभर पुढे गेली.
अमेरिकन संरक्षण कंपनी ‘जीई एअरोस्पेस’ने दुसरे इंजिन हिंदुस्थानात पाठवले आहे. त्याला लवकरच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरू प्लांटमध्ये पाठवले जाईल. हे इंजिन स्वदेशी ‘तेजस एमके – 1 ए’ला जोडले जाईल. ऑगस्ट 2021 मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने ‘जीई एअरोस्पेस’ला 99 इंजिनांसाठी (एफ404) करार केलेला आहे. त्यातील पहिले इंजिन दीड वर्षांच्या विलंबानंतर एचएएला मिळणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List