इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, लष्करी मुख्यालय उडवले
इराण विरुद्धचे युद्ध थांबून 15 दिवस उलटत नाहीत तोच इस्रायलने नवी आघाडी उघडली असून आज सीरियात भीषण हल्ला केला. इस्रायली सैन्याने सीरियाचे दमास्कस येथील लष्करी मुख्यालयच उडवून टाकले.
इस्रायलने आधी सीरियाच्या लष्करी मुख्यालयावर बॉम्बहल्ले केले. त्यानंतर अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ एअर स्ट्राइक केला. दक्षिण सीरियाच्या सुवेदा शहरात डज बंडखोर व सीरियन लष्करामध्ये तुंबळ संघर्ष सुरू आहे. या संघर्षात हस्तक्षेप करत इस्रायलने गेल्या सीरियात हल्ले सुरू केले आहेत.
टीव्ही अँकर पळाली!
बॉम्बहल्ल्यामुळे सीरियात भीतीचे वातावरण आहे. इस्रायल सरकारी इमारतींना लक्ष्य करत आहे. सरकारी मीडिया हाऊसमध्ये एक महिला अँकर टीव्हीवर बातम्या देत असताना बॉम्ब पडले. त्या आवाजाला घाबरून ती अँकर लाइव्ह प्रसारण सोडून पळाली. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List