ईडीला दणका… सुजित पाटकर यांना दोन वर्षांनंतर जामीन, आरोप सिद्ध झाले नसताना एखाद्याला तुरुंगात ठेवणे घटनेत बसत नाही – हायकोर्ट

ईडीला दणका… सुजित पाटकर यांना दोन वर्षांनंतर जामीन, आरोप सिद्ध झाले नसताना एखाद्याला  तुरुंगात ठेवणे घटनेत बसत नाही – हायकोर्ट

जम्बो कोविड सेंटर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुजित पाटकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. अर्जदार दोन वर्षांपासून तुरुंगात असून आरोप अद्याप निश्चित झालेले नाहीत. किंबहुना खटला वाजवी कालावधीत पूर्ण होण्याची शक्यताही नाही. अशा परिस्थितीत अर्जदाराला अटक करणे म्हणजे एक प्रकारे खटल्यापूर्वीची शिक्षाच आहे; परंतु हे घटनात्मक चौकटीत बसत नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने पाटकर यांचा जामीन मंजूर करून ईडीला दणका दिला. त्याचबरोबर एक लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

सुजित पाटकर यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. पाटकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अॅड. विवेक बाबर व अॅड. नीलेश नवले यांनी युक्तिवाद केला.

अर्जदार पाटकर यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते मुंबईचे कायमचे रहिवाशी आहेत. पळून जाण्याचा किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याचा, साक्षीदारांना प्रभावित करण्याचा त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. किंबहुना फिर्यादी पक्षाने (पोलीस) तसा आरोप केलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;