ट्रेंड – डिव्होर्स कॅम्प… नवी सुरुवात
घटस्फोटित महिलांना भावनिक आधाराची गरज असते. त्याचेच दर्शन घडवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘ब्रेक फ्री स्टोरीज’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओमध्ये दिसतंय की, केरळमध्ये डिव्होर्स पॅम्प उघडण्यात आला आहे. घटस्फोटित, विभक्त किंवा विधवा महिलांसाठी एक सुरक्षित जागा तयार करण्याचा निर्णय एका महिलेने घेतला आहे. घटस्फोटित महिलांना इतरांशी जोडण्यास, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी सांगण्यास, त्यांच्या आयुष्यातील आनंद पुन्हा शोधण्यास मदत करणे हा यामागील उद्देश होता. निसर्गाच्या कुशीत हा कार्यक्रम झाला आणि त्यात विविध उपक्रमांचा समावेश होता. घटस्फोटित, विभक्त किंवा विधवा महिला नाचताना, गाताना, हसताना आणि नवीन नाती निर्माण करताना दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List