पंढरपुरात माय-लेकराचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना

पंढरपुरात माय-लेकराचा निर्घृण खून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना

पंढरपूर येथील नवीन कुंभार गल्लीत राहणाऱ्या माय-लेकराचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 15) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेखा संजय जगताप (वय – 60), लखन संजय जगताप (वय – 24) अशी मयतांची नावे आहेत.

संजय हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता त्यांचा पत्नीशी फोनवरून संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतले, तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली होती. घर उघडून आत जाताच त्यांना मुलगा लखन आणि पत्नी सुरेखा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. लखन हा डिलिव्हरी बॉ य म्हणून काम करत होता, तर सुरेखा या गृहिणी होत्या.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;