फोटोच्या नादात डॉक्टर खड्डय़ात
फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. कोणत्याही ठिकाणी गेल्यास दोन-चार फोटो काढतातच. मध्य प्रदेशातील सिवनी जिह्यात एका प्रसिद्ध डॉक्टरला काम करतानाचा फोटो काढणे चांगलेच महागात पडले. प्रफुल्ल श्रीवास्तव असे डॉक्टरचे नाव आहे.
शहरातील एका प्रसिद्ध मंदिराचे बांधकाम सुरू होते. या मंदिराच्या बांधकामात सिमेंट भरत होते. हातात सिमेंटचे टोपले होते. सिमेंट भरतानाचा फोटो त्यांना काढायचा होता, परंतु त्यांच्या साथीदाराने एक फोटो काढला, परंतु तो व्यवस्थित आला नाही. हा फोटो नीट आला नाही, दुसरा काढू या, असे त्यांना सांगितले. पांढऱ्याशुभ्र पेहरावात डॉक्टरने दुसरे सिमेंटचे टोपले हाती घेतले. दुसरा फोटो काढायचा तितक्यात पायाखालची वीट घसरली आणि डॉक्टर थेट सहा फूट खड्डय़ात खाली पडले. त्यांना यात किरकोळ दुखापत झाली, परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List