महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगाने मिळून ढापली, राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा हल्ला

महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगाने मिळून ढापली, राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा हल्ला

‘भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हे एकत्र मिळून काम करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या दोघांनी मिलीभगत करून ढापली. बिहार आणि आसाममध्येही हेच करण्याचा त्यांचा डाव आहे,’ असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला.

आसाममध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. हे लोक बिहारमध्ये नवीन मतदार यादी तयार करत आहेत. लाखो लोकांना मतदार यादीतून वगळले जात आहे. निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नाही, तो फक्त भाजप नेत्यांचे ऐकतो. आम्ही निवडणूक आयोगाकडून अनेक वेळा मतदार यादी मागितली. पत्र लिहिले, पण काहीही मिळाले नाही. ते फक्त सबबी सांगतात, कामे करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

मी जे बोलतो, ते घडतं!

‘मी जे बोलतो, ते आणि तसेच घडते! कोविड काळातील अनागोंदी, नोटबंदी चुकीच्या जीएसटीच्या बाबतीत मी जे बोललो, ते खरे ठरले. आज मी हे सांगतो की आसामचे मुख्यमंत्री काही दिवसांनी तुरुंगात दिसतील. मोदी-शहासुद्धा त्यांना वाचवू शकणार नाहीत. हिमंत बिस्व सरमा हा माणूस स्वतःला राजा समजतो. लोकांवर ओरडतो, पण त्याच्या मनात भीती आहे. हा माणूस 24 तास आसामचे भूखंड चोरण्यात गुंतलेला असतो, असा घणाघात राहुल यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता, फक्त प्या ‘हे’ हर्बल जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता, फक्त प्या ‘हे’ हर्बल
आजकाल अस्वस्थ जीवनशैलीमुळे तसेच खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्याने वजन वाढण्याच्या समस्या आता सामान्य झाले आहे. बहुतेक लोकं वाढत्या वजनाने त्रस्त आहेत....
अध्यक्षांचं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला लाज आणणारं आहे, भास्कर जाधव भडकले
अमिताभ बच्चन ‘या’ शोच्या एका एपिसोडसाठी घेताहेत 5 करोड, वाचा सविस्तर
निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली
लग्नानंतर माझ्याकडे काम नव्हते, त्यावेळी मी गौतमीच्या कमाईवर जगत होतो! राम कपूर
पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे, शरीरासाठी ते किती फायदेशीर? घ्या जाणून
अहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत मोठा खुलासा; कॅप्टननेच विमानाच्या इंजिनचे इंधन केले बंद