गाझामध्ये अन्नासाठी धावाधाव; चेंगराचेंगरीत 43 ठार
एकीकडे इस्रायलकडून गाझात विविध ठिकाणी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे गाझातील नागरिकांचा अन्नासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. अन्नासाठी झालेल्या धावाधाव आणि झटापटीमुळे खान युनूस येथील अन्न वितरण केंद्रात 43 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 21 जणांचा अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात तर 15 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.
गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशन केंद्रात ही चेंगराचेंगरीची घटना घडली. इस्रायली सैन्य आणि अमेरिकेकडून जाणुनबुजून भुकेल्या लोकांची कत्तल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही करण्यता आला आहे.
पॅलेस्टिनींना ड्रग्ज दिल्याचा आरोप
गाझा ह्युमॅनेटियन फाऊंडेशनकडून पॅलेस्टिनींना देण्यात आलेल्या पिठाच्या पोत्यांमध्ये ऑक्सिकोडोन नावाच्या अमली पदार्थांच्या गोळय़ा आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकांना ड्रग्जचे व्यसन लावण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप गाझातील सरकारी मीडिया ऑफिसने केला आहे. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत तब्बल 58 हजार 573 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List