कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर यांची निवड झाली आहे. बुधवारी सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
सुनील नारकर हे 1997 पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.कोकण रेल्वे मधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक यादीवर त्यांनी यशस्वी काम केले. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List