Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध

Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध

विधानसभेच्या सुरू अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत दलित वस्त्यांमध्ये वाढलेल्या अर्बन नक्षलवादावर आमदार हेमंत पाटील यांनी टीका करून वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढला आहे. याचा उल्लेख करताना आ. हेमंत पाटील यांनी बोंढार जिल्हा नांदेड येथे झालेला अक्षय भालेराव यांचा खून आणि परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू याबाबत बोलताना सवर्ण मंडळीवर खोटे अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे दाखल होतात. आपल्यावर देखील डॉ. वाकोडे यांनी अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढत आहे. त्याला आवर घालावा, अशी मागणी विधानपरिषदेत आ. हेमंत पाटील यांनी केली होती. आ. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आ. हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करून हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अक्षय बनसोडे म्हणाले की, “आ. हेमंत पाटील हे जातीयवादीच आहेत. सरड्यासारखे रंग बदलतात. बोंढार आणि परभणी येथे ज्यांचा मृत्यू झाला त्यावर भाष्य न करता यात अडकलेल्या व्यक्तींची पाठराखन करत आहे. निलंबीत झालेल्या पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची आमदार हेमंत पाटील यांच्या शेतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करून दिली होती. सभागृहात भालेराव व सुर्यवंशी यांच्यावरील अन्यायाबाबत न बोलता अर्बन नक्षलवाद राज्यात वाढला आहे, अशी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी दलित समाजाला डिवचले आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो.” असे बनसोडे म्हणाले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी युवा महानगर अध्यक्ष राहुल सोनसळे, अक्षय बनसोडे, प्रशांत इंगोले, आकाश जोंधळे, विशाल एडके, कुलदिप राक्षसमारे, रितेश गुळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या युवा सेलचे असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते. अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;