Air India Plane Crash- अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातल्या 7 मराठी प्रवाशांची नावे आली समोर

Air India Plane Crash- अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातल्या 7 मराठी प्रवाशांची नावे आली समोर

अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाच्या विमानाच अपघात होऊन कोसळले. उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटातच विमान कोसळले. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाने उड्डाण केले आणि नंतर ते 625 फूट उंचीवर पोहोचले, परंतु काही क्षणातच विमान खाली येऊ लागले. काही क्षणातच विमान खाली पडले आणि मग एक मोठा स्फोट झाला.

फ्लाइट AI171 मधील ADS-B डेटा दर्शवितो की विमानाने 625 फूट उंची गाठली आणि नंतर -475 फूट प्रति मिनिट या उभ्या वेगाने खाली उतरण्यास सुरुवात केली. एटीसीच्या म्हणण्यानुसार, 12 जून रोजी दुपारी 1.39 वाजता विमानाने उड्डाण केले. विमानात 242 प्रवासी होते. यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर करत होते. एटीसीच्या म्हणण्यानुसार, विमानाने अहमदाबादहून 1339 भारतीय वेळेनुसार (0809 यूटीसी) धावपट्टी 23 वरून उड्डाण केले. त्यांनी एटीसीला मे डे कॉल दिला, परंतु एटीसीने केलेल्या त्यानंतरच्या कोणत्याही कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान जमिनीवर कोसळले. या विमानातील 2 क्रू मेंबर मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक असून, या व्यतिरिक्त इतर 5 जणांचा प्रवाशांच्या यादीत समावेश आहे.

Ahmedabad Plane Crash- 625 फूट उंचीवर पोहोचलेले विमान, उड्डाणाच्या 1 मिनिटातच कोसळले

 

कोणत्या मराठी प्रवाशांचा समावेश?

महादेव पवार
आशा पवार
मयूर पाटील
अपर्णा महाडिक
मैथिली पाटील
दीपक पाठक
रोशणी सोंघरे

Air India Plane Crash – जेवता जेवता डोळ्यासमोर दिसला मृत्यू! डाॅक्टर्स हॉस्टेलवर विमान कोसळलं

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;