Air India Plane Crash – विमान अपघातातील जीवितहानीने अत्यंत दु:खी; रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडून शोक व्यक्त

Air India Plane Crash – विमान अपघातातील जीवितहानीने अत्यंत दु:खी; रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडून शोक व्यक्त

अहमदाब येथे गुरुवारी एअर इंडियाचे ड्रिमलायनर विमान कोसळून तब्बल 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला तर विमान जिथे कोसळले त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील व आजुबाजूच्या 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे प्रमुख यांनी प्रतिक्रिया देत दुख व्यक्त केलं आहे.

”नीता आणि मी तसेच संपूर्ण रिलायन्स कुटुंब अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुखी आणि वेदनेत आहोत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना आम्ही मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या काळात, रिलायन्स मदत आणि बचाव कार्यासाठी पूर्णपणे आणि ठामपणे पाठीशी उभी आहे आणि शक्य त्या प्रत्येक प्रकारे मदतीसाठी तयार आहे. या अपरिमित दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती आणि धैर्य सर्वांना मिळो, हीच प्रार्थना. ॐ शांती.”, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;