50 लाखांच्या मुद्देमालासह चोरटे गजाआड, 12 तासांत ठोकल्या बेड्या; कोल्हापूर पोलिसांची कामगिरी

50 लाखांच्या मुद्देमालासह चोरटे गजाआड, 12 तासांत ठोकल्या बेड्या; कोल्हापूर पोलिसांची कामगिरी

बंगल्यात एकट्याच असलेल्या वृद्धाला चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या हेल्मेटधारी दोन चोरट्यांना अवघ्या बारा तासांत गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले. चोरट्यांकडून 440 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 75 हजार रुपये रोख असा एकूण 50 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दिवसाढवळ्या चोरीचा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

अमित शिंदे (25, रा. यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर), प्रकाश चौगुले (38, रा. हंचनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी गजाआड केलेल्यांची नावे आहेत. उद्योजक राजीव पाटील (गोविंद सावंत हौ. सो., सम्राटनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

अमित शिंदे हा फिर्यादी राजीव पाटील यांच्या घरी चालक म्हणून काम करत होता. कर्जबाजारी झाल्याने त्याने साथीदारासह मालकाच्याच घरात चोरी केल्याचे उघड झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.

राजीव पाटील त्यांच्या बंगल्यात वयस्कर सासऱ्यांना ठेवून कुलूप लावून ते कामाच्या ठिकाणी जात. त्यांच्या गाडीवर आरोपी अमित शिंदे हा चालक म्हणून काम करत होता. यामुळे त्याचा पाटील यांच्या घरात नेहमी वावर असल्याने त्याला घराची संपूर्ण माहिती होती. बंगल्यात सासरे एकटेच असताना दुपारी सव्वा चारच्या सुमारास अमित शिंदे आणि त्याचा साथीदार प्रकाश चौगुले हे दोघे हेल्मेट घालून दुचाकीवरून आले. वयस्कर सासऱ्याला चाकूचा धाक दाखवून, ही चोरी केली. पुढे गोकुळ शिरगाव येथे दुचाकी एका पेट्रोल पंपावर सोडून तेथून चारचाकी घेऊन त्यांनी पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच राजीव पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत, फिर्याद केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीची पाहणी केली. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार वरील दोघे गोकुळ शिरगाव येथील लक्ष्मी टेकडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना एका चारचाकी गाडीसह पकडले. गाडीच्या तपासणीवेळी त्यांना डिक्कीमध्ये सदरच्या मुद्देमालासह दोन बॅगा, चाकू, दोन हेल्मेट आणि रेनकोट असे एकूण 50 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीवेळी दोघांनी चोरीची कबुली दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;