Air India Plane Crash – 1206 रुपाणींचा लकी नंबर

Air India Plane Crash – 1206 रुपाणींचा लकी नंबर

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटायला लंडनला निघाले होते, परंतु विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. विजय रुपाणी यांच्या मृत्यूनंतर एक विचित्र योगायोग समोर आला आहे. खरं म्हणजे विजय रुपाणी हे 1206 हा आकडा खूप शुभ मानायचे. हा नंबर त्यांच्यासाठी नेहमी लकी ठरलेला होता. त्यांनी त्यांच्या वाहनांवरील नंबरही 1206 असाच ठेवला होता, परंतु गुरुवारी मात्र हाच आकडा त्यांच्यासाठी अशुभ ठरला. अपघात झालेल्या दिवसाची तारीख ही 12-06 (12 जून) अशी होती. हीच त्यांच्या आयुष्याची शेवटची तारीख ठरली. विजय रुपाणी यांची पहिली कार आणि जुनी स्कूटर या दोन्ही वाहनांचा नंबरसुद्धा 1206 हाच आहे. आजही या क्रमांकाची कार आणि स्कूटर त्यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या आहेत. त्यांच्या सर्व वाहनांचा नंबर 1206 हाच आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;