Air India Plane Crash – कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; बोइंग ड्रीमलायनर्सच्या ताफ्याची तपासणी होणार, DGCA चा मोठा निर्णय

Air India Plane Crash – कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; बोइंग ड्रीमलायनर्सच्या ताफ्याची तपासणी होणार, DGCA चा मोठा निर्णय

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. गुजरात सरकारच्या 40 कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमान अपघात तपास ब्युरोच्या (AAIB) एका टीमने ब्लॅक बॉक्स शोधून काढला आहे. हा ब्लॅक बॉक्स डॉक्टरांच्या हॉस्टेलच्या छतावर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेच्या 28 तासांनंतर हा ब्लॅक बॉक्स सपडला. ब्लॅक बॉक्स मिळाल्याने विमान दुर्घटना कशी घडली? याच्या कारणांचा छडा लावता येणार आहे.

Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

दुसरीकडे, डीजीसीएने एक मोठा निर्णय घेतला आहे. एयर इंडियाच्या बोइंग 787-8/9 ताफ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. फ्युल पॅरामीटर सिस्टम, टेकऑफ मानके आणि विमान सुरक्षेच्या इतर महत्त्वाच्या पैलूंचे मूल्यांकन केले जाईल. 15 जूनपासून ही तपासणी सुरू होईल.

Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला, कशी घडली विमान दुर्घटना? लवकरच समोर येणार

केंद्रीय यंत्रणांकडून तपास

अहमदाबादमधील कालच्या विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तपासाची जबाबदारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (AAIB) सोपवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;