SA Vs AUS WTC Final 2025 – जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

SA Vs AUS WTC Final 2025 – जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात World Test Championship 2023-25 च्या फायनलचा रणसंग्राम सुरू आहे. दोन्ही संघ जगज्जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज देत आहेत. अशातच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी फलंदाजी करताना 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आता जिंकण्यासाठी 282 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव समाप्त होण्यापूर्वी 148 या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला 9वा हादरा बसला होता. मात्र त्यानंतर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी दहाव्या विकेटसाठी 59 धावांची ऐतिहासिक भागी केली. याचसोबत त्यांनी 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. ICC फायनलमध्ये 10व्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागी करण्याचा विक्रम आता मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम 1975 साली वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्याच डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 10व्या विकेटसाठी 41 धावांची भागी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;