Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू

Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या अपघाताने अनेकांची स्वप्न हिरावून घेतली आहेत. काहीजण लंडनमध्ये नव्याने सुरुवात करणार होते, काहीजण पहिल्यांदा विमानात बसले होते, तर काहीजण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लंडनला निघाले होते. या प्रवाशांमध्ये केरळच्या रंजीता यांचा सुद्धा समावेश होता. ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या रंजीता या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी हिंदुस्तानात आल्या होत्या. हिंदुस्थानात परतून दोन मुलांसोबत कायमचं राहण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं.

Air India Plane Crash – धुरच धूर, काहीच दिसेना… ब्लँकेट गुंडाळत अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला स्वतःचा जीव

केरळच्या पतनमतिट्टा जिल्ह्यातील तिरुवल्ला येथील रहिवाशी असलेल्या रंजीता युकेमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या. दोन लहान मुलांच्या उज्जव भविष्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत होत्या. चांगली संधी मिळाली म्हणून त्या लंडनला गेल्या होत्या. त्या पुन्हा हिंदुस्थानात येण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती. घराचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. त्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पुढे कुटुंबासोबत राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु विमान अपघाताने त्यांच स्वप्न हिरावून घेतलं. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा इयत्ता 10वीमध्ये आणि लहान मुलगी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. रंजीता यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;