Crime news – उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून प्रियकराने केली महिलेची हत्या

Crime news – उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून प्रियकराने केली महिलेची हत्या

हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील हॉटेल सागरिकामध्ये प्रियकरानेच आपल्या विवाहित प्रेयसीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

हातकणंगले हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस करूनही ती परत देत गुन्हा दाखल भेटण्याचे निमित्त सुमन सरगर (रा. उंचगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. आदम गौस पठाण (रा. घुणकी, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

आदमगौस पठाण याचे सुमन सरगरशी अनैतिक संबंध होते. तो तिच्यासमवेत अतिग्रे येथील लॉजमध्ये आला होता. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती. पठाने याने सुमनला दिलेल्या पैशाची वारंवार मागणी नव्हती. त्यामुळे त्याने करून तिला लॉजवर बोलावले आणि तिथेच त्याने तिच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने चिठ्ठी लिहून स्वतःही विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी आत्महत्येची घटना रोखत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच, जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंकी व हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पठाणला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने सुमन सरगर हिने सात लाख रुपये घेतले असल्याचे सांगितले. सुमन ही रक्कम परत देणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिला लॉजवर भेटण्यास बोलावून तिची हत्या केल्याची कबुली दिली.

पठाण याने काही वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नीचाही खून केल्याची घटना समोर आली आहे. तो कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला होता. याबाबत त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;