दादरच्या सावरकर सदनाचे बांधकाम जैसे थे, राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाबाबत प्रतिज्ञापत्रसादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ

दादरच्या सावरकर सदनाचे बांधकाम जैसे थे, राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाबाबत प्रतिज्ञापत्रसादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दादर येथील ऐतिहासिक सावरकर सदनचे बांधकाम आणखी काही दिवस जैसे थे ठेवण्यात येणार आहे. सदनला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या पालिकेच्या शिफारशीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकारने हायकोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने तीन आठवडय़ांची मुदत सरकारला वाढवून देत बांधकाम सध्या आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितले.

वारसा स्थळ आणि राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत सावरकर सदनचा समावेश महापालिकेने 2012 साली केला असून अंतिम शिफारशीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. असे असतानाही इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याने वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यापूर्वी इमारत पाडली जाईल, असा दावा करत अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे अध्यक्ष पंकज फडणीस यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सावरकर सदनला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या महापालिकेच्या शिफारशीवर अंतिम निर्णय घेण्याबाबत आणखी वेळ देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्राची ताटके यांनी केली.

खंडपीठाने ही मागणी मान्य करत सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत दिली व बांधकाम जैसे थे ठेवण्याबाबत दिलेला आदेश कायम ठेवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;