सीडीएस लष्कराऐवजी हवाई दलाचा हवा, हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला होऊ शकतो! संरक्षणतज्ञ प्रवीण साहनी यांचा सावधगिरीचा इशारा

सीडीएस लष्कराऐवजी हवाई दलाचा हवा, हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला होऊ शकतो! संरक्षणतज्ञ प्रवीण साहनी यांचा सावधगिरीचा इशारा

हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघर्षामध्ये शस्त्रसंधी झालेली नाही. केवळ तात्पुरता विराम झालेला आहे. दोन्ही बाजूंकडून कधीही पूर्ण तयारीने युद्ध सुरू होऊ शकते. मात्र पाकिस्तानकडून ही शक्यता जास्त आहे. चीनच्या साथीने पाकिस्तान कधीही कश्मीरवर, हिंदुस्थानवर हल्ला करू शकतो. त्यामुळे हिंदुस्थानने अत्यंत सावध राहायला हवे,’ असा सावधगिरीचा इशारा माजी लष्करी अधिकारी व संरक्षणतज्ञ प्रवीण सहानी यांनी आज दिला. हिंदुस्थानने आगामी काळात लष्कराऐवजी आता हवाई दलाचा सीडीएस बनवावा, असा सल्ला त्यांनी दिला.

दक्षिण-पूर्व आशियामधील भू-राजकीय परिस्थितीवर प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रवीण सहानी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या परिस्थितीबाबत भाष्य केले. आता पूर्वीप्रमाणे केवळ सीमारेषेवर युद्ध होत नसून दोन्ही देशांतील शहरांना त्याचा धोका आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण वाढवणे गरजेचे आहे. पाकिस्तानच्या पाठीशी चीन खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे पाकची क्षमता वाढलेली आहे, याची दखल हिंदुस्थानने घेण्याची गरज आहे, असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी श्रोत्यांमध्ये शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. आशियावर सध्या संपूर्ण जगाचे व विशेष करून अमेरिका, चीन व रशिया यांचे जास्त लक्ष आहे. रशिया व चीन एकत्र आहे तर हिंदुस्थान अमेरिकेच्या नेटवर्कचा हिस्सा बनला आहे. हिंदुस्थानची 3.9 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे तर चीनची 19 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे हिंदुस्थान चीनशी स्पर्धा करू शकत नाही. चीन भारतासोबत युद्ध करणार नाही, मात्र चीन पाकिस्तानसोबत आहे. त्यामुळे गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हवाई दलावरील खर्च वाढविण्याची गरज

हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद नेमकी किती आहे याचा पाकला आता अंदाज आला आहे. त्यामुळे ते आता अलर्ट मोडवर आहेत. त्यातच चीनने पाकला अत्याधुनिक उपकरणे दिली आहेत. हिंदुस्थानने लष्करावरील खर्च कमी करून हवाई दलावर वाढवण्याची गरज आहे. आशियात फारसे लक्ष घालण्यास अमेरिका तयार नाही, पण चीनची पाकला साथ आहे. सिमला कराराद्वारे लाईन ऑफ पंट्रोल तयार झाली, मात्र आता पाकिस्तानने सिमला करार सोडण्याचे संकेत दिले आहेत, असे साहनी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;