India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका

India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहेत. अशातच आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हिंदुस्थानात परतल्याचे वृत्त समोर आले आहे. गौतम गंभीर यांच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे गौतम गंभीर तात्काळ हिंदुस्थानात दाखल झाला आहे.

49 चेंडूत 150 धावा, 19 षटकारांची आतषबाजी; IPL मध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा, ख्रिस गेलचा विक्रम मोडला

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 20 जून पासून हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावाला सुरूवात केली आहे. गौतम गंभीर सुद्धा खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी इंग्लंडमध्ये उपस्थित होते. परंतु गौतम गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना ह्रदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने तात्काळ हिंदुस्तानात येण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जूनपर्यंत गौतम गंभीर पुन्हा इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत जोडले जाणार असल्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;