Air India Plane Crash – 1 कोटी काय देता, मी तुम्हाला दोन कोटी देते माझे वडील परत आणून द्या; महिलेने सुनावलं

Air India Plane Crash – 1 कोटी काय देता, मी तुम्हाला दोन कोटी देते माझे वडील परत आणून द्या; महिलेने सुनावलं

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान या अपघातात आपले वडील गमावलेल्या एका महिलेने यावरून एअर इंडिया प्रशासनाला फैलावर घेतले आहे. ”तुम्ही काय एक कोटी देता. मी तुम्हाला 2 कोटी देते. माझे वडील मला परत आणून द्या”, असे त्या महिलेने एअर इंडियाला सुनावले आहे. फाल्गुनी असे त्या महिलेचे नाव आहे.

”तुम्ही विमान चेक करायला हवं होतं का नाही तपासलं. मस्करी बनवून ठेवलीय का एअर इंडिया वाल्यांनी. पैशाने तुम्ही सगळं विकत घेऊ शकता पण माझे वडिल आणून देऊ शकता का? पैशाने झोपण्यासाठी पलंग विकत घेता येईल पण त्या पलंगावर झोप कशी येईल. पैशाने खरं प्रेम विकत घेता येईल का जे प्रेम माझे वडील माझे वडील माझ्यावर करत होते. देशप्रेमी होते माझे वडील म्हणून एअऱ इंडियाने जायचे. काय मिळालं त्यांना? असा सवाल फाल्गुनी यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;