चम्पूहरणम्, मृगयाकलह:.. नाशिककरांसाठी संस्कृत नाट्यसप्तकाची पर्वणी, 22 जून रोजी रंगणार महोत्सव

चम्पूहरणम्, मृगयाकलह:.. नाशिककरांसाठी संस्कृत नाट्यसप्तकाची पर्वणी, 22 जून रोजी रंगणार महोत्सव

शाळेत स्कोरिंग विषय म्हणून बघितला जाणारा संस्कृत विषय नंतरच्या आयुष्यात फक्त एखाद्या उत्सवात किंवा पूजाअर्चेच्या वेळी मंत्र म्हणण्या पुरता मर्यादित होता. मात्र गेल्या काही वर्षात संस्कृतासाठी चांगले दिवस आले आहेत. तरुणाईचा ओढा संस्कृत शिकण्याकडे आणि भाषा वापरात आणण्याकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुण्यामुंबई पाठोपाठ नाशिक सारख्या शहरात देखील संस्कृतप्रेमींची संख्या वाढत असून आता संस्कृत नाट्य चळवळ देखील उभी राहिली आहे. महाकवी कालिदासदिनाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण द्वैपायन गुरुकुल आणि रुपकादी शोध मंच यांनी संयुक्तरित्या नाशिकमध्ये संस्कृत नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्रात नाट्यगृहांना ‘अच्छे दिन’ आले असतानाच आता नाशिकरांना संस्कृत नाटकांची पर्वणी अनुभवता येणार आहे. महाभारतातील अर्जुनाच्या पाशुपतास्त्र प्राप्तीची कथा, आजोबा आणि नातीच्या निर्मळ नात्याची गोष्ट तसेच हिंदुस्थानची भव्य सांस्कृतिक परंपरा संस्कृत नाट्यातून समोर येणार आहे.

रविवार, 22 जून रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या वेळात संस्कृत नाट्यमहोत्सव रंगणार आहे. यावेळी नाट्यप्रेमींना लागोपाठ सात संस्कृत नाट्यांचा अनुभव घेता येणार आहे.

चम्पूहरणम्, मृगयाकलह:, भगवदज्जुकम्, अम्बरीषाख्यानम् यासह तीन बालनाट्य अवयवकलह:, बुधिर्बवती सदा आणि न कालिदासादपरस्य वाणी अशा नाट्यसप्तकाची पर्वणी नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

कालिदास दिन हा कला, साहित्य आणि संस्कृती यांचा गौरव पाहण्याचा एक सोहळा असतो, आणि या वर्षी तरुणाईच्या कल्पक विचारांतून हा गौरव साकारला जाणार आहे, तेव्हा या क्षणांचे आमण साक्षीदार व्हावे, असे आवाहन संस्कृत नाट्य लेखिका रुचिता पंचभाई यांनी केली आहे.

Sanskrit Drama Festival in Nashik on June 22 to Celebrate Kalidasa Day

Nashik to host a grand Sanskrit Drama Festival on June 22 featuring seven plays including Champuharanam and Mrigayakalahah. The event celebrates Kalidasa Day and revives interest in Sanskrit through youth-driven performances.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाकात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी नॉनस्टिक भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. कमी तेलात झटपट शिजणारे पदार्थ...
टॅनिंगशी संबंधित या पाच मिथकांवर लोक ठेवतात सहज विश्वास, कोणते आहेत ते जाणून घेऊयात
Air India Plane Crash – अपघाताच्या तिसऱ्या दिवशी विमानात सापडला एक मृतदेह, ढिगारा उपसण्याचे काम सुरूच
Air India Plane Crash – विमान अपघातात मृत्यू झालेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत देणार, टाटा समूहाचा निर्णय
बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम
इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग
मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही, मृत्युच्या ढिगाऱ्यावर उभे राहून रील बनवत बसले; संजय राऊत कडाडले