मैथिली आणि दीपक नक्की परत येतील…पाटील व पाठक कुटुंबीयांचे दाराकडे डोळे

मैथिली आणि दीपक नक्की परत येतील…पाटील व पाठक कुटुंबीयांचे दाराकडे डोळे

मैथिली आणि दीपकबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ते नक्की परत येतील  अशी भाबडी आशा उरणच्या पाटील आणि बदलापूरच्या पाठक कुटुंबीयांनी व्यक्त केली. आपली मुले कोणत्याही क्षणी येऊन हाक मारतील या आशेपोटी दोन्ही कुटुंबीयांचे डोळे दरवाजाकडे लागले आहेत.  

परिस्थितीशी लढत ती एअर होस्टेस बनली

पनवेल तालुक्यातील न्हावा गावात मैथिली पाटील (22) ही एअर इंडियाची क्रू मेंबर आई, वडील आणि भावंडांसह राहत होती. याच गावातील टी. एस. रेहमान शाळेत ती शिकली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने एअर होस्टेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दोन वर्षांपूर्वी ती एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून रुजू झाली. अत्यंत शांत, संयमी आणि मेहनती असलेल्या मैथिलीला नृत्य, गायनाबरोबरच भजनाचीही आवड होती. दोन महिन्यांपूर्वी तिने शिक्षण घेतलेल्या टी. एस. रेहमान शाळेतील एका कार्यक्रमात तिने सहभागी होत विद्यार्थ्यांना करीअरबाबत मार्गदर्शनही केले होते. गुरुवारी एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अहमदाबादमध्ये भयंकर अपघात झाला. या विमानात एअर होस्टेस म्हणून तिची ड्युटी होती. या भयंकर घटनेनंतर  तिच्या घरी नातेवाईक आणि गावकऱ्यांची रीघ लागली आहे. परंतु मैथिली या जगातच नाही यावर तिच्या कुटुंबीयांना विश्वासच बसत नाही. जिथे असेल तिथून ती नक्की घरी परत येईल या भाबडय़ा आशेवर तिचे कुटुंबीय दाराकडे डोळे लावून बसले आहेत.

 आई लवकरच येतो.. दीपकचा अखेरचा कॉल

ड्युटीवर जाण्याआधी दीपक पाठक आईला फोन करायचा. घरातल्या सदस्यांसह मित्रांना लोकेशनही पाठवायचा.  दुर्घटनेतील ड्रीमलायनर विमानावर दीपक पाठकची को पायलट म्हणून ड्युटी होती. आई, वडील व एक बहीण असा त्याचा परिवार आहे. बदलापूरच्या कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्समध्ये त्याचे कुटुंबीय राहत होते. गुरुवारी त्याने आईला केलेला कॉल अखेरचा ठरला. त्याचे फ्लाईट लंडनसाठी टेकऑफ करण्यापूर्वी दीपकने आईला पह्न केला, ‘आई लवकरच परत येतो…, तू काळजी करू नको…’ हे त्याचे शब्द अखेरचे ठरले. पण दीपकच्या मृत्यूबद्दल कोणतीही अधिकृत माहिती एअर इंडियाकडून पिंवा सरकारी यंत्रणेकडून मिळाली नसल्याने तो वाचला असेल आणि तो नक्की परत येईल, असे दीपकची बहीण शृतिका शेजवळ म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;