विक्रोळी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, पूर्व उपनगरातील कोंडी फुटणार

विक्रोळी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला, पूर्व उपनगरातील कोंडी फुटणार

विक्रोळीतील पश्चिमेकडील एलबीएस रोडला पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा 615 मीटर लांबीचा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.  पावसाळय़ातील संभाव्य वाहतूक अडचणी लक्षात घेऊन कोणत्याही औपचारिक समारंभाशिवाय या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून वाहतुकीसाठी हा पूल खुला केला जाणार आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पूर्व आणि पश्चिम विक्रोळीला जोडणाऱ्या विक्रोळी पुलाचे पूर्व भागाचे काम एप्रिल महिन्यात तर पश्चिमेकडील पुलाच्या भागावर दोन स्टॅण्ड गर्डर बसवण्यात आल्यानंतर एक गर्डर बसवण्याचे काम 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले.

अर्ध्या तासाची होणार बचत

पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्राr मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा सुमारे अर्ध्या तासाची बचत होणार आहे.

अशी आहे पुलाची रचना 

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी मुंबई महापालिकेने केली आहे तर तसेच उर्वरित 50 मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. या पुलावर महापालिकेने सुमारे 2 हजार 142 टन इतक्या वजनाचे गर्डर टाकले आहेत तसेच या गर्डरची लांबी 25 ते 30 मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण 18 तुळई  टाकण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;